Pimpri : पिंपरी-चिंचवड संगीत अकादमीच्या मासिक संगीत सभेत ताल रसिकांची भरभरून दाद

एमपीसी न्युज – भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीतर्फे दर महिन्याच्या 11 तारखेला मासिक संगीत सभा घेतली जाते. जुलै महिन्याची सभा (मंगळवारी, दि. 11) पार पडली. महेश साळुंखे यांनी एकल तबलावादन सादर केले. पिंपरी (Pimpri) चिंचवड शहरातील दर्दी रसिक तसेच अकादमीचे विद्यार्थी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.

Maharashtra : मुंबई आणि पुण्यातील घरांच्या किंमतीत ३ टक्क्यांची वाढ: प्रॉपटायगर

महेश साळुंखे यांनी ताल त्रितालमध्ये एकापाठोपाठ एक तबल्याचे पलटे सादर केले. तसेच विविध हरकती वाजवत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तबल्याबरोबर त्यांनी पंजाबमधील गुरुद्वारामध्ये वापरले जाणारे ‘धामाजोरी’ या वाद्याचा देखील समावेश केला होता.

 

याचा आवाज पखवाज किंवा मृदुंगा सारखा येतो. नंतर दृतलयीमध्ये काही पलटे सादर करीत अखेर तबला व धामाजोरीवर ज्ञानोबा तुकारामच्या ठोक्यावर कार्यक्रमाची सांगता झाली. मंत्रमुग्ध झालेल्या रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

 

तबलावादक महेश साळुंखे यांनी ललित कला केंद्र येथे एम ए संगीत पदवीत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. साळुंखे यांनी अनेक मोठमोठ्या कलाकारांना तबल्याची साथ केली आहे. महेश साळुंखे यांना अकादमीचे संवादिनी शिक्षक व प्रसिद्ध संवादिनीवादक उमेश पुरोहित यांनी संवादिनी (हार्मोनियम) वर साथसंगत केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.