Wakad : हॉटेलमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये जेवण करताना एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून वाद झाला. यामध्ये एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना बुधवारी (दि. 31) रात्री अकराच्या सुमारास काळेवाडी येथील बैठक हॉटेल येथे घडली.

राहुल अशोक घोडेश्वर (वय 30, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जगदीश नढे (रा. काळेवाडी) आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हे त्यांचे दाजी विजय बानायत यांच्यासोबत बुधवारी रात्री काळेवाडी मधील बैठक हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेले. जेवण करत असताना आरोपी जगदीश आणि राहुल यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. जगदीश याने राहुल यांना शिवीगाळ केली व त्यांच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने मारले. यामध्ये राहुल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच जगदीशच्या मित्रांनी राहुल यांना खाली पडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.