Wakad : वाकड येथे स्पा सेंटरवर छापा; स्पा मॅनेजरसह चौघांना अटक

एमपीसी न्यूज – वेश्या व्यवसाय प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Wakad) कारवाई करत वाकड येथील अन्या बॉडी मसाज व स्पा सेंटरवर छापा मारत स्पा मॅनेजरसह चार जणांना अटक केली असून एका महिलेचे सुटका केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.9) रात्री घडली.

प्रतिक कोलम (वय 48 रा. कोरेगाव पार्क), प्रियो सोयम मिताई (वय 30, रा. वाकड),राज टंकाबहादूर (वय 22) महिला आरोपी यांना अटक केली आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस फौजदार बंडू मारणे यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad) फिर्याद दिली आहे. पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होते.

Hinjawadi Crime : क्रिकेट ग्राऊंडची नासधूस करत ग्राउंड मालकाला दिली जीवे मारण्याची धमकी

यावरून छापा टाकत पोलिसांनी पीडितेची सुटका करत मॅनेजरसह चौघांना अटक केली आहे. वाकड पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.