Hinjawadi Crime : क्रिकेट ग्राऊंडची नासधूस करत ग्राउंड मालकाला दिली जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – माण येथील खासगी क्रिकेट ग्राऊंडची (Hinjawadi Crime) नासधुस व चोरी करत ग्राऊंड मालकालाच जिवे मारण्याची व मुळशी पॅटर्न करण्याची धमकी दिल्याची घटना घडली. यावरून दहा ते अकरा जणांच्या टोळक्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शुक्रवारी (दि.10) विकास आण्णासाहेब एकशिंगे (वय 45 रा. रहाटणी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून प्रभाकर दगडू बोडके, संताजी दगडू बोडके, राजाराम दगडू बोडके, प्रवीण अरूण बोडके, सिताराम सोपान बोडके, मैना अरूण बोडके, हरिश भगवान बोडके, निलेश भगवान बोडके, निखील पांडे, निखील राराम बोडके, आनंद प्रभाकर बोडके (सर्व रा. बोडकेवाडी, माण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon : टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी माण गावच्या हद्दीत सर्व्हे क्रं. 187 मध्ये 5 एकर क्षेत्रात उच्च प्रतिच्या ग्रासमध्ये क्रिकेटचे ग्राऊंड बनवले आहे. येथे आरोपींनी येत ग्राऊंडमध्ये बेकायदा प्रवेश करत साहित्य, लॉक तोडून फिर्यादीच्या साहित्याची चोरी केली.

याचा जाब विचारला असता हातपाय तोडून टाकू, मुळशी पॅटर्न करून (Hinjawadi Crime) विषय संपवून टाकू अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्या ग्राऊंडचे नुकसान व चोरी असे एकूण 1 कोटी 50 लाख रुपयांचे नुकसान केले. अद्याप कोणालाही अटक झाली नसून हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.