Talegaon : टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – टाटा कंपनीच्या टँकरच्या (Talegaon) धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात तळेगाव दाभाडे ते चाकण रोडवर सुदवडी येथे शुक्रवारी (दि.10) सकाळी घडला आहे.

संतोष दादाराव सुरवाडे (वय 33) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून रामनागारण रतन यादव (रा.कल्याण) या टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रवीकिरण रामकृष्ण पोटू (वय 35 रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC : सुरतच्या धर्तीवर डांबर, काँक्रिट मिश्रणातून रस्ते निर्मितीचा प्रयोग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच 13 डी.क्यू. 2100 हा टाटा कंपनीचा टँकर आरोपी भरधाव वेगाने चालवत होता. यावेळी संतोष कंपनीत कामाला जात असताना त्यांच्या दुचाकीला टँकरेने मागून जोरदार धडक दिली.

यात संतोष सुरवाडे गंभीर जखमी झाले व यातच त्यांचा (Talegaon) मृत्यू झाला. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.