PCMC : सुरतच्या धर्तीवर डांबर, काँक्रिट मिश्रणातून रस्ते निर्मितीचा प्रयोग

एमपीसी न्यूज – गुजरातमधील सूरत शहरात राबविण्यात (PCMC) आलेला डांबर व काँक्रिट मिश्रणातून रस्ते निर्मिती आणि सांडपाण्याचा पुनर्वापर प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. तो प्रयोग यशस्वी ठरल्यास तो संपूर्ण शहरात राबविला जाणार आहे. आयुक्त शेखर सिंह यांची ही नवीन संकल्पना आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे, असे स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी नुकतेच गुजरातमधील सुरत शहराच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात कमी खर्चात डांबर व काँक्रीटच्या दर्जेदार रस्त्याची निर्मिती आणि सांडपाण्याचा पुनर्वापर या प्रकल्पाची अधिकाऱ्यांनी केली. असे प्रकल्प शहरात राबविण्याचा मानस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Chinchawad Bye-Election: होऊ द्या खर्च! खर्चाची मर्यादा 40 लाखांवर

सूरत शहरात कमी खर्चात डांबरी व काँक्रिट अशा मिश्रणातून अधिक दर्जेदार रस्ते बनविले जात आहेत. त्या रस्त्यांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी अधिकाऱ्यांनी केली. हे रस्ते पाच वर्षे टिकतात. त्याचा (PCMC) खर्च तुलनेत कमी असून दर्जाही अधिक उत्तम आहे. तसेच, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. प्रक्रिया केलेले पाणी विकून त्या माध्यमातून सूरत पालिकेला उत्पन्न मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.