Chinchawad Bye-Election: होऊ द्या खर्च! खर्चाची मर्यादा 40 लाखांवर

एमपीसी न्यूज – वाढती महागाई आणि मतदार संघातील वाढत्या (Chinchawad Bye-Election) लोकसंख्येमुळे विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा 28 लाख रुपयांवरून 40 लाख रुपये करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाचा याचा फायदा चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील उमेदवारांना होणार आहे.

राज्यात 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 28 लाख रुपये होती. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील प्रत्येक लोकसभा मतदार संघातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच महागाईतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी अनेक राजकीय पक्षांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय गेल्या वर्षी केंद्र सरकारने घेतला. हा निर्णय महाराष्ट्र, उत्तर प्रदेशासह मोठ्या राज्यांसाठी लागू करण्यात आला आहे. यापूर्वी लोकसभेच्या उमेदवाराला (Chinchawad By Election) खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये होती, ती आता वाढवून 95 लाख रुपये करण्यात आली. तर, विधानसभेसाठी ही मर्यादा 28 लाख रुपये होती, ती आता वाढवून 40 लाख रुपये (Chinchawad Bye-Election) करण्यात आली आहे.

Pune : मजूरांच्या खोलीतून चार मोबाईल अन कपडेही चोरीला

निवडणुकीत उमेदवाराने प्रचारावर किती खर्च करायला हवा, याची मर्यादा निवडणूक आयोगाकडून निश्‍चित करण्यात करण्यात आली आहे. या मर्यादेपेक्षा अधिक खर्च करणे म्हणजे निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन समजले जाऊन संबंधित उमेदवारांना नोटीस पाठविली जाते.

उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा काम करत आहे. जिल्हा प्रशासनाने पोटनिवडणुकीत उमेदवारांकडून करण्यात येणारा खर्च तपासण्यासाठी जिल्हा दरसूची तयार केली आहे. ही दरसूची जाहीर करण्यात आली आहे. तसेच दरसूचीनुसारच 40 लाखांच्या मर्यादेत उमेदवारांना निवडणूक खर्च करता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.