Pune : मजूरांच्या खोलीतून चार मोबाईल अन कपडेही चोरीला

एमपीसी न्यूज – घरातून सोन्या-चांदीचे दागिने, हिरे चोरीला (Pune) गेल्याचे एकले असेल पण शिरगाव येथे मजुरांच्या खोलीतून चार मोबाईल व चक्क कपडे चोरीला गेले आहेत. ही चोरी गुरुवारी (दि.9) शिरगाव येथील चौधरी चाळ येथे घडली आहे.

धर्मेंद्र दत्तन सिंह (वय 49 रा. शिरगाव) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari : उसने पैसे मागितले म्हणून डोक्यात काचेची बाटली फोडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रहात असलेल्या भाड्याच्या खोलीच्या उघड्या दरवाजातून चोरट्यांनी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्याचे 4 मोबाईल व कपड्यांची बॅग (Pune) असा एकूण 24 हजार रुपयांचा मुद्देमनाल चोरून नेला आहे. यावरून शिरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.