Bhosari : उसने पैसे मागितले म्हणून डोक्यात काचेची बाटली फोडली

एमपीसी न्यूज – कोणाला कशाचा राग येईल सांगणे (Bhosari) कठीण आहे. पैसे उसने मागितले याच्या रागातून चक्क काचेची बाटली डोक्यात फोडून जखमी केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.9) भोसरी येथे घडला आहे.

याप्रकरणी मोहनसिंग पहाडसिंग ठाकुर (वय 34 रा. भोसरी) यांनी शुक्रवारी (दि.10) फिर्याद दिली असून खेमसिंग ठाकूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : ग्रामीण भागातील मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सायकलींचे वाटप – वैशाली दाभाडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकूर हे व्यावसायिक असून त्यांनी हात उसणे म्हणून आरोपीकडे पैसे मागितले. याच रागातून आरोपीने चक्क काचेची दारुची बाटली फिर्यादीच्या डोक्यात (Bhosari) मारून जखमी केले आहे. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.