Talegaon Dabhade : ग्रामीण भागातील मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सायकलींचे वाटप – वैशाली दाभाडे

एमपीसी न्यूज – ग्रामीण भागातील मुलींच्या शैक्षणिक (Talegaon Dabhade) प्रगतीला गती देण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने 20 सायकलींचे वाटप करण्यात आले. मुलींनी त्यांना मिळालेल्या शिक्षणाच्या संधीचे सोने करून दाखवावे असे प्रतिपादन क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी केले. भविष्यात देखील आणखी 35 सायकलींचे वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने मौजे निगडे मावळ येथील ‘मावळ शिक्षण प्रतिष्ठान’ संचलित प्रतिक विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय येथे 20 सायकलींचे वाटप करण्यात आले.

या वेळी अध्यक्षा वैशाली दाभाडे, मुग्धा जोर्वेकर,वर्सा कंट्रोलच्या संचालिका अर्चना चितळे, ममता मराठे,हेमलता खळदे, डॉ दीपाली झंवर (भंडारी), संगीता जाधव,माया भेगडे, सुनंदा काळोखे, मीरा बेडेकर, मुख्याध्यापक मिंडे, मंडलिक, शिक्षक वर्ग, तसेच विद्यार्थिनीचे पालक उपस्थित होते.

Alandi Crime : महिलेला मारहाण करत केला विनयभंग

दाभाडे पुढे म्हणाल्या की, समाजातील विविध माध्यमातून (Talegaon Dabhade) शिक्षणाच्या माध्यमातून मिळत असलेल्या संधीचे मुलींनी सोने करून दाखवावे,महिला सक्षमीकरणा बरोबर ग्रामीण भागातील मुलींचा शैक्षणिक टक्का वाढविण्यासाठी भविष्यात विविध उपक्रम राबविणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले.

रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत ग्रामीण भागातील विद्यार्थींनींची शैक्षणिक प्रगती साधावी व स्वयंसिध्दा व्हावे या भावनेतून आज आपण 20 सायकलींचे वाटप केले आहे  व पुढील काळात अजून 35 सायकली आपण देणार असल्याचे क्लब अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी सांगितले.

मावळ प्रतिष्ठानचे सचिव यादवेंद्र खळदे यांनी समाजातील विविध भागातील गरजा ओळखून क्लब करत असलेल्या कामाबद्दल वैशाली दाभाडे आणि टीमचे विशेष कौतुक केले.

प्रास्ताविक मुख्याध्यापक मिंडे सर यांनी केले,कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केले. या उपक्रमासाठी उद्योजक विकास टोके (वेदांत इक्विनंती & सेल्फ, प्रा लि.), अर्चना उद्धव चितळे (व्हर्सा कंट्रोल मेजरमेंट टेक्नाॅलाॅजिस प्रा.लि), ममता विश्वनाथ मराठे, अर्चना देशमुख, डॉ. दिपाली झंवर (भंडारी), हेमलता खळदे, ज्योती चोळकर व प्रकल्प प्रमुख मुग्धा जोर्वेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.