Alandi Crime : महिलेला मारहाण करत केला विनयभंग

एमपीसी न्यूज – महिलेला मारहाण करत (Alandi Crime) तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या तिघांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.10) रात्री आळंदी येथे घडली.

महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जगदिश काकडे व दोन अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vadgaon Ghenand : उसन्या पैशांवरून मित्रानेच केला जीवघेणा हल्ला; लाखोंचा फोन व गाडी चोरली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती घरात नसताना आरोपी व त्याचे साथीदार यांनी पीडितेचे पती आल्याचे भासवून घरात जबरदस्ती प्रवेश केला.

पीडितेचे तोंड दाबून पीडितेचा विनयभंग केला. तसेच पीडितेने (Alandi Crime) आरडाओरड केली असता लाथाबुकक्यांनी मारहाण केली. आरोपींना अद्याप पोलिसांनी अटक केली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.