Vadgaon Ghenand : उसन्या पैशांवरून मित्रानेच केला जीवघेणा हल्ला; लाखोंचा फोन व गाडी चोरली

एमपीसी न्यूज – उसन्या पैशाच्या वादावरून मित्रानेच (Vadgaon Ghenand) मित्रावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला व मित्राची लाखोंची गाडी व महागडा फोन दोन्ही चोरून घेऊन गेला. हा प्रकार शुक्रवारी (दि.10) मध्यरात्री वडगाव घेनंद येथे घडला आहे.

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गिरीश विठ्ठल ढोमे (वय 26 रा. भोसरी) यांनी शुक्रवारी (दि.10) फिर्याद दिली असून सौरभ गोरख बिबे (वय 22 रा. मोशी प्राधिकरण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad Election : चिंचवडमध्ये वाहनांची तपासणी करत असताना तपासी पथकाने जप्त केली 43 लाखांची रोकड

पोलिसांनी दिलेल्या (Vadgaon Ghenand) माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे मित्र आहेत. त्यांच्यातील उसन्या पैशांच्या व्यवहारातून आरोपीने कुऱ्हाडीने हातावर, खांद्यावर, डोक्यात गंभीर स्वरूपाचे वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच फिर्यादीची दहा लाख रुपयांची ब्रीझा कार व  दीड लाख रुपयांचा एपल 11 प्रो मोबाईल हिसकावून घेऊन गेला. आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.