Shri Khsetra Beli : वडगांव घेनंद येथील पांडवकालीन मंदिरात शंकराच्या दर्शनासाठी गर्दी

एमपीसी न्यूज : वडगांव घेनंद गावच्या डोंगराच्या कुशीत पांडव कालीन महादेवाचे मंदीर श्री क्षेत्र बेली (Shri Khsetra Beli) आहे. या मंदीराला पडूं पुत्र भिम आणि बकासुर या पौराणिक कथेचा आधार सांगीतला जातो. श्रावण महिन्याच्या सोमवारी वडगाव आणि आळंदी पंचक्रोशीतील शिवभक्त येथे मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात.

या मंदिराचा अलिकडच्याच काळात जीर्णोद्धार केला आहे. येथील महादेव मंदिर डोंगराच्या कुशीत वसलेले असल्याने पूर्वी डोंगराच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी वेडीवाकडी वळण्याची पायवाट होती. नंतरच्या या काळात मंदिराजवळून डोंगरावर काही अंतरापर्यंत पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत. मंदिरा भोवती ऊन, वारा, पाऊस यापासून भाविकांचे संरक्षण होण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले आहे.

या मंदिरात सोमवारी श्रावणी सोमवार निमित्त अनेक भाविकांनी शिव पिंडीवर जलाभिषेक केला. तसेच, महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र, मूग, पुष्प वाहिले. महादेवाचे दर्शन झाल्यानंतर येथील शिवभक्तांकडून भाविकांना खिचडी, केळी या प्रसादाचे वाटप करण्यात आले. हे मंदिर डोंगराच्या कुशीत व घनदाट वृक्ष असलेल्या ठिकाणी असल्याने जंगली वनप्राण्यांचा वावर या परिसरात आढळतो. येथे आल्यानंतर (Shri Khsetra Beli) मोरांचे आवाज भाविकांचे लक्ष वेधून घेतात. या मंदिर परिसरात मोर कधीतरी दृष्टीस देखील पडतात.

Kurwande : आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून अखेर धनगर वस्तीवर पोहचली वीज

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.