Chinchwad Election : चिंचवडमध्ये वाहनांची तपासणी करत असताना तपासी पथकाने जप्त केली 43 लाखांची रोकड

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Chinchwad Election) पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने अनुचित प्रकार टाळण्याबाबत वाहनांची तपासणी करण्यासाठी चेक पोस्ट उभारल्या आहेत. शुक्रवारी (दि. 10) दळवीनगर चिंचवड येथील चेक पोस्टमध्ये तपासणी दरम्यान एका कारमध्ये 43 लाख रुपयांची रोकड आढळली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटण्यासारखे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाने चिंचवड विधानसभा क्षेत्राच्या हद्दीमध्ये वाहन तपासणीसाठी चेकपोस्ट उभारले आहेत. यामध्ये संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.

दळवीनगर चिंचवड येथील चेक पोस्टवर शुक्रवारी दुपारी एका कारमध्ये सुमारे 43 लाख रुपयांची रोकड आढळली. ही रोकड एका खासगी संस्थेची असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रशासनाने ही रोकड जप्त करत आयकर विभागाच्या ताब्यात दिली आहे. आयकर विभागाकडून याबाबत चौकशी केली जात असून (Chinchwad Election) चौकशीअंती पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

Pune : पुण्यात विवाहित महिला डॉक्टरांसाठी मिसेस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धा संपन्न

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.