Pune : पुण्यात विवाहित महिला डॉक्टरांसाठी मिसेस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धा संपन्न

एमपीसी न्यूज – मेडिक्वीन मेडिको पिजंट तर्फे (Pune) विविध वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांसाठी सौंदर्य स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. हे चौथे यशस्वी वर्ष असून यात ॲलोपॅथी, आयुर्वेद, डेंटल, होमिओपॅथी, फिजिओथेरपी अशा सर्व डॉक्टरांसाठी 22 ते 24 जानेवारी बालेवाडी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 200 विवाहित महिला डॉक्टरांनी ऑडिशनमध्ये भाग घेतला आणि 32 जणांची अंतिम फेरीत निवड झाली. या रॉयल श्रेणीतून (वय 23 – 47 वर्षे) 3 विजेते, क्लासिक श्रेणी (48 वर्षे आणि त्यावरील) 3 विजेते आणि एक सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या विजेत्या डॉक्टरांची निवड करण्यात आली.

मेडिक्वीन मेडिको पिजंटच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर आणि सचिव डॉ. प्राजक्ता शहा यांनी आयोजन केले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मेडिक्वीन डॉक्टरांचे कौतूक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि महिला आरोग्य या संर्दभातील कामाचे कौतुक केले.

यावेळी अभिनेता आदिनाथ कोठारे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून (Pune) उपस्थित होते. या थीमला पाठिंबा देत सर्व डॉक्टर महिलांना प्रोत्सहन देण्याचे काम केले. या वर्षीच्या या कार्यक्रमाचे अंतिम फेरीचे परीक्षक कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जन डॉ. मेधा भावे, मॉडेल आणि अभिनेत्री डॉ. पूजा वाघ आणि दिग्दर्शक केदार गायकवाड तर अभिनेता तेजपाल वाघ सेमी फायनल आणि सामाजिक कार्य परीक्षक यु.एस.ए.तील डॉ. जया दप्तरदार यांनी काम बघितले.

या तीन दिवसीय कार्यक्रमात डॉक्टरांचे ग्रूमिंग, मेकअप, फोटो शूट आणि व्यक्तिमत्व विकास आणि कॅमेऱ्याला कसे सामोरे जायचे याचे प्रशिक्षण स्पर्धकांना देण्यात आले.

यावर्षीची मिसेस महाराष्ट्र रॉयल (वय 23 – 47 वर्षे) पहिला क्रमांक कल्याणची डॉ. सोनली पितळे, दुसरा क्रमांक साताऱ्याची डॉ. धनश्री नलावडे आणि तिसरा क्रमांक विभागून ठाण्याची डॉ. स्नेहल कोहाले आणि पुण्याची नेहा सावंत तर मिसेस महाराष्ट्र क्लासिकमध्ये (48 वर्षे आणि त्यावरील) प्रथम क्रमांक मुंबईची डॉ. ज्ञानदा बांदोडकर, दुसरा क्रमांक मुंबईची डॉ. अश्विनी नाबर आणि तिसरा क्रमांक मुंबईची डॉ. पर्णा ठक्कर आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या पुण्यातील डॉ. स्म्रिती हिंदारिया याना सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी मुंबई ऑन्कोकेअर सेंटर, विमल बाफना, पूनम मेहता,  संगीता शहा, डॉ. नंदिता पालशेतकर, अनुप मोरे स्पोर्ट्स अँड सोशल फाऊंडेशनआणि डॉ रितू दवे यांनी पाठिंबा दिला.

त्याच बरोबर गिफ्टिंग पार्टनर राधा बुटीक आणि सिल्किटट्यूडच्या (Pune) डॉ. मृणाल इनामदार तर मीडिया पार्टनर म्हणून महाराष्ट्र न्युजच्या डॉ. रिता शेटीया आणि एस. पी. 9 चे सागर पाटील यांनी काम पहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सोनी तर कोरिओग्राफर योगेश पवार यांनी काम पहिले.

Sun Breaks : शास्त्रज्ञांनी केला धक्कादायक दावा; सूर्याचा मोठा भाग तुटला?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.