Khed : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पत्नी आणि दोन मुलांना (Khed ) घेऊन जात असलेल्या दुचाकीस्वाराने भरधाव दुचाकी चालवली. दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी घसरून अपघात झाला. त्यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना 24 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता खेड तालुक्यातील वडगाव घेनंद येथे घडली.

किरण दगडू साळवे (वय 22, रा. गोलेगाव पिंपळगाव, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण साळवे हा त्याची पत्नी आणि दोन मुलांना घेऊन शेलगाव येथून पिंपळगाव येथे जात होता. तो वडगाव घेनंद येथे आला असता एका वळणावरून (Khed ) जात असताना भरधाव दुचाकी चालवल्याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीचा अपघात झाला.

Maval : प्रमोद देशक यांची मावळ लोकसभा ‘फ्रेंडस ऑफ बीजेपी’ संयोजक पदी निवड

या अपघातात किरण याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात किरण याची मोठी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.