Chakan : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव टेम्पोने एका (Chakan) दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 17) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडवर मेदनकरवाडी येथे घडली.
दशरथ अर्जुन झिंजुरके (वय 71, रा. कडाचीवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे. याप्रकरणी काळूराम आनंदा खांडेभराड (वय 47, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो (एमएच 46/एफ 0830) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Khed : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मामा दशरथ हे त्यांच्या दुचाकीवरून मेदनकरवाडी येथून कडाचीवाडी येथे (Chakan ) जात होते. चाकण-शिक्रापूर रोडने जात असताना शिक्रापूर बाजूकडून येत असलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. त्यात दशरथ हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.