World cup 2023 – ग्लेन मॅक्सवेल चे झंजावती द्विशतक; ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

एमपीसी न्यूज – मुंबईच्या वानखेडे मैदानावर कारकीर्दीतील (World cup 2023)सर्वोत्तम खेळी करताना ग्लेन मॅक्सवेलने 128 चेंडूत 201 धावांची झंजावती द्विशतक ठोकत अफगाणिस्तानच्या मुखातून विजयाचा घास हिसकावून घेतला.

या विजयासह ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचणारा (World cup 2023)भारत आणि दक्षिण आफ्रिके नंतर तिसरा संघ ठरला. त्यामुळे उपांत्य फेरीच्या चौथ्या जागेसाठी न्युझीलँड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस असणार आहे.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर ,बागेश्वर धामच्या कार्यक्रमास उपस्थिती

18 षटकांत 7 बाद 91 धावा अशा दयनीय अवस्थेत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा डाव एकट्या मॅक्सवेलने तारला. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर सपशेल शरणागती पत्करली. या पार्श्वभूमीवर मॅक्सवेलने पायाला दुखापत झाली असताना देखील कर्णधार पेट कमिन्स ला सोबत घेत एकाकी झुंज देत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मॅक्सवेल 33 धावांवर असताना मुजीब उर रहमानने त्याचा झेल सोडत जीवनदान दिले. या संधीचा फायदा घेत मॅक्सवेलने चौफेर फटकेबाजी केली, 21 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 128 चेंडूत 201 धावांची शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या गोठ्यात विजय खेचून आणला. या संपूर्ण खेळीत मॅक्सवेलचा स्ट्राइक रेट 157.03 असा होता. त्याला पेट कमिन्सने चांगली साथ दिली. पेट कमिन्सने 68 चेंडू खेळून 12 धावा केल्या त्याचा स्ट्राईक रेट 17.65 होता. त्याने एका बाजूने विकेट्स पडू दिल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष 46.5 षटकांत गाठले.

तत्पूर्वी अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी सलामीवीर इब्राहिम जादरान 129 धावा, राशिद खान 35 धावा आणि रहमत 30 धावा यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला 292 धावांची लक्ष्य दिले. या लक्षाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली.

नवीन उल हक, ओमरजाई, राशिद खान यांनी भेदक गोलंदाजी करत प्रत्येकी दोन गडी बाद केले. यांनी केलेल्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया 7 बाद 91 धावा अशा दयनीय अवस्थेत पोहोचला. यावेळी अफगाणिस्तानचा विजय निश्चित मानला जात होता, परंतु मॅक्सवेल नावाचे वादळ मुंबईच्या वानखेडे मैदानावर घोंगावले आणि त्याने केलेल्या दिशतकीय खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.


या विश्वचषकामध्ये एकूण दहा संघांमध्ये विश्वचषक प्रभावित करणारा संघ अफगाणिस्तान ठरला आहे. अफगाणिस्तानने सर्वांना आश्चर्यचकित करत विश्वचषकात दमदार कामगिरी केली. तथापि अफगाणिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.