Dehugaon : इंद्रायणी नदीमध्ये बुडून युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- इंद्रायणी नदीमध्ये बुडून एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज, रविवारी दुपारी अडीच वाजता  देहूगाव जवळील येलवाडी येथे घडली.

केतन गायकवाड (वय 20) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.  घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ चे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन तास नदीपात्रामध्ये शोध घेतल्यानंतर संध्याकाळी सव्वाचार वाजता मृतदेह हाती लागला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.