११ डिसेंबर : दिनविशेष

What Happened on December 11, What happened on this day in history, December 11. See what historical events occurred, which famous people were born and who died on December 11.

११ डिसेंबर : दिनविशेष

११ डिसेंबर – महत्वाच्या घटना

  • १८१६: इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.

    १९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर.

    १९४१: दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.

    १९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना.

    १९६७: कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.

    १९७२: अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.

    १९९४: अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.

    २००१: चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश.

    २००६: अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.

११ डिसेंबर – जन्म

  • १८४३: क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९१०)

    १८६७: आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९४०)

    १८८२: तामिळ साहित्यिक सुब्रम्हण्यम भारती यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९२१)

    १८९२: पद्मभूषण, रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यसभा खासदार, योजना आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष, ओरिसाचे राज्यपाल, पद्मविभूषण अयोध्या नाथ खोसला यांचा जन्म.

    १८९९: कादंबरीकार पुरूषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म.

    १९०९: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते भाषाशास्त्रज्ञ नारायण गोविंद कालेलकर यांचा जन्म.

    १९१५: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १९९६)

    १९२२: अभिनेते मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांचा जन्म.

    १९२५: मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २००६)

    १९२९: लेगस्पिनर सुभाष गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००२)

    १९३१: आचार्य रजनीश यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९९०)

    १९३५: भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म.

    १९४२: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९९)

    १९६९: भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म.

११ डिसेंबर – मृत्यू

  • १७८३: रघुनाथराव पेशवा यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १७३४)

    १९७१: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९०२)

    १९८७: लेखक गुरुनाथ आबाजी कुलकर्णी उर्फ जी. ए. कुळकर्णी यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९२३)

    १९९२: भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन.

    १९९८: राष्ट्रकवी प्रदीप यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १९१५)

    २००१: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९०९)

    २००१: झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान मेन्झा चोना यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९३०)

    २००२: कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचे निधन. (जन्म: १६ जानेवारी १९२०)

    २००४: भारतरत्न गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे निधन.

    २०१३: भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी यांचे निधन.

    २०१५: भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार हेमा उपाध्याय यांचे निधन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.