१२ डिसेंबर : दिनविशेष

What Happened on December 12, What happened on this day in history, December 12. See what historical events occurred, which famous people were born and who died on December 12.

१२ डिसेंबर : दिनविशेष

१२ डिसेंबर – महत्वाच्या घटना

  • १७५५: डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन.

    १८८२: आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.

    १९०१: जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.

    १९११: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.

    १९७१: संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले.

    २००१: पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.

    २०१६: प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.

१२ डिसेंबर – जन्म

  • १८७२: राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक आणि नाशिक येथील भोंसला मिलिटरी स्कूल चे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९४८)

    १८८१: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक हॅरी वॉर्नर यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९५८)

    १८९२: गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९६५)

    १९०५: लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर २००४)

    १९०७: संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९५०)

    १९१५: हॉलिवूड मधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९९८)

    १९२५: भारतीय क्रिकेटर दत्ता फडकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९८५)

    १९२७: इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक रॉबर्ट नोयस यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९९०)

    १९४०: राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म.

    १९५०: प्रसिध्द अभिनेते शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत यांचा जन्म.

    १९५२: भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी हरब धालीवाल यांचा जन्म.

    १९८१: भारतीय क्रिकेटपटू युवराजसिंग यांचा जन्म.

१२ डिसेंबर – मृत्यू

  • १९३०: परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून निधन.

    १९६४: हिन्दी राष्ट्रकवी मैथिलिशरण गुप्त यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १८८६)

    १९९१: शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर यांचे निधन.

    १९९२: साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०६ – आंबेडे, सातेरी, गोवा)

    २०००: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९३०)

    २००५: हिंदी चित्रपट निर्माते रामानंद सागर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९१७)

    २००६: सीगेट टेक्नोलॉजी चे सहसंस्थापक अॅलन शुगर्ट यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९३०)

    २०१२: सतार वादक, भारतरत्‍न पण्डित रवी शंकर यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९२०)

    २०१२: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९२७)

    २०१५: भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९३५)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.