BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : मूकबधिर मुलांनी तयार केलेल्या लघुपटांचा डेफ फिल्म फेस्टिव्हल रविवारी पिंपरीत

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या पाच मूकबधिर मुलांनी तयार केलेल्या लघुपटांचा डेफ फिल्म फेस्टिव्हल प्रथमच रविवारी (दि. 19) पिंपरीच्या आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये आयोजित करण्यात आला आहे. स्वतः मूकबधिर असून देखील लघुपट निर्मिती करून या मुलांनी समाजासमोर एक आदर्श प्रस्तुत केला आहे.

अरुण गायकवाड, गजानन जगताप, सुदर्शन फटांगडे, राहुल मरसुते, किशोर साळुंखे अशी ही पाच मुले असून त्यांनी वेगवेगळ्या विषयावर फादर सन प्रॉब्लेम केअर फन्नी, फार्मर, व्हाय अवॉर्ड?, हॉरर, चॅट ? ब्रेन क्रेज, अँग्री v/s हॅप्पी या लघुपटांची निर्मिती केली आहे. सुदर्शन फटांगडे हा संतनगर
मोशी प्राधिकरण येथील रहिवासी असून विश्रांतवाडी येथील सी आर रंगनाथन महाविद्यालयात इयत्ता 12 च्या कला शाखेमध्ये शिक्षण घेत आहे.
त्याने फादर सन प्रॉब्लेम केअर फन्नी, व्हाय अवॉर्ड?, अँग्री v/s हॅप्पी हे तीन लघुपट बनवले आहेत. हा महोत्सव रविवारी (दि. १९) दुपारी 12 ते 3 या वेळेत भरवण्यात आला आहे.

या मुलांच्या या कलागुणांनचे कौतुक करण्यासाठी डेफ फिल्म फेस्टिव्हल पाहायला या असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement