Pune : वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

एमपीसी न्यूज – वाहतुकीचे नियम मोडणा-या मित्रावर पोलिसांनी कारवाई केल्याचा राग धरून पोलिसांशी हुज्जत घालणा-या तिघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

याप्रकरणी वाहतूक विभागाचे पोलीस नाईक शशिकांत सपकाळ यांनी फिर्याद दिली होती. सारंग शैलेंद्र चौधरी (वय 21, रा. लोहगाव), विभोर नरेशपाल तोमर (वय 20, रा. लोहगाव), रामेश्वर अरविंदकुमार सिंग (वय 20, रा. लोहगाव) अशी यातील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या कर्तव्यावर असताना यातील आरोपींनी त्यांचा मित्र जतीन रविंद्रकुमारवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन केल्यामुळे करण्यात आलेल्या कारवाईचा राग मनात धरून फिर्यादींशी हुज्जत घालून त्यांना अपशब्द वापरून त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

त्यामुळे त्या तिघांवर चतु;श्रृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी आरोपींना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.