Pune Court : पुणे जिल्ह्यातील न्यायालयांना मंगळवारी सुट्टी

एमपीसी न्यूज – महावीर जयंती निमित्त पुणे जिल्ह्यातील (Pune Court) सर्व न्यायालये मंगळवारी (दि. 4) बंद राहणार आहेत. तसे परिपत्रक पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांनी काढले आहे.

मंगळवारी महावीर जयंती निमित्त पुणे न्यायिक जिल्ह्यातील सर्व न्यायालय आणि त्यांच्या कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महावीर जयंती निमित्त दिलेल्या सुट्टीच्या बदल्यात जून महिन्यातील दुसऱ्या शनिवारी (10 जून) रोजी न्यायालयीन कामकाज सुरू राहणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

PCMC : उपयोगकर्ता शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करा – महेश लांडगे

सण, उत्सव, रविवार, महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार, उन्हाळी आणि हिवाळी असे वर्षभरात एकूण 130 दिवस न्यायालयाला सुट्टी असणार आहे. (Pune Court) दरम्यान, रविवार व इतर सार्वजनिक सुट्ट्या वगळून पुणे जिल्ह्यातील सर्व फौजदारी न्यायालये व त्यांची कार्यालये उन्हाळी आणि हिवाळी सुट्टीत सुरु राहणार आहेत.

वर्षभरात 52 रविवार, प्रत्येक महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवारच्या 24 सुट्ट्या, वर्षभरातील सण व उत्सवाच्या 26 सुट्ट्या मिळणार आहेत. त्याव्यतिरिक्त 8 मे ते 4 जून या कालावधीत 22 दिवस उन्हाळी तर 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत सहा दिवस हिवाळी सुट्ट्या असणार आहेत. (Pune Court) सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतील. मात्र महावीर जयंती निमित्त सुट्टी दिल्याने जून महिन्यातील दुसऱ्या शनिवारी पुणे जिल्ह्यातील न्यायालये सुरू राहणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.