Vinaya Tapkir: विनया तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी 2234 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – चऱ्होली येथील माजी नगरसेविका विनया प्रदीप तापकीर (Vinaya Tapkir) यांचा वाढदिवस रविवारी (दि. 2)  विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या अनुषंगाने आयोजित रक्तदान शिबिरात एका दिवसात विक्रमी 2,234 रक्तदात्यांनी रक्तदान केले. पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्त संकलन झाल्याचा हा विक्रम मानला जातो.

चऱ्होली, चोविसावाडी येथील गुरुकृपा मंगल कार्यालय येथे विनया तापकीर (Vinaya Tapkir) यांच्या वाढदिवसानिमित्त (दि.2)विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर, अनुज तापकीर तसेच चऱ्होली येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. खेड तालुक्यातील दापोलीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका साधनाताई बोत्रे यांनी रक्तदान शिबिरास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाच्या निमित्ताने ॲकॉर्ड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व फॅमिली हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिराला विक्रमी असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकाच दिवशी 2234  रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले.

यावेळी विनया तापकीर (Vinaya Tapkir) म्हणाल्या की, कोणत्याही आनंदी क्षणाला विधायक उपक्रमाची जोड देण्यात यावी, असा उद्देश ठेवून दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.

येथील नागरिक या शिबिरात आवर्जून सहभाग नोंदवतात. अजूनही‎ आपल्याला कृत्रिम रक्त तयार‎ करता आलेले नाही. त्यामुळेच‎ मानवी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान‎ आहे. आपल्या शरीरातील‎ थोड्याशा रक्ताचे दान केल्यामुळे‎ एखाद्याचे प्राण वाचत असेल तर‎ यासारखे मोठे सामाजिक कार्य‎ नाही.

PCMC : उपयोगकर्ता शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करा – महेश लांडगे

रक्तदानामध्ये गेलेल्या‎ रक्ताची शरीरात पुन्हा काही‎ तासांतच निर्मिती होऊन आवश्यक‎ ती पातळी राखली जाते.‎रक्तदानामुळे रक्तदात्याला‎ कोणताही धोका नाही. अशी जनजागृती ही या शिबिराच्या निमित्ताने दरवर्षी होते, असेही तापकीर म्हणाल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.