Pune News : ‘थर्टी फर्स्ट’ला 121 मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज : मद्य प्राशन करुन वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी नववर्षाच्या मध्यरात्री कारवाई केली. (Pune News) या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी 121 वाहनचालकांच्या विरोधात कारवाई केली.

मद्य प्राशन करुन भरधाव वाहन चालविल्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. गंभीर स्वरुपाचे अपघात रोखणे तसेच मद्यपी वाहचनचालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी शनिवारी (31 डिसेंबर) रात्री विशेष मोहीम (ड्रंक अँड ड्राइव्ह) राबविली. वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्ते तसेच चौकात बंदोबस्त तैनात केला होता.

Talegaon Dabhade : तळेगाव तलावामध्ये स्थानिक माशांच्या प्रजातींचे रोपण कार्यक्रम

नववर्षाच्या रात्री मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या 121 वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. (Pune News) नववर्षाच्या दिवशी वाहनचालकांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. वाहतूक पोलिसांनी शहरातील 27 ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.