Talegaon Dabhade : तळेगाव तलावामध्ये स्थानिक माशांच्या प्रजातींचे रोपण कार्यक्रम

एमपीसी न्यूज : तळेगाव नगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने 31 डिसेंबर ला सकाळी 7.30 वा. संपन्न झाला. (Talegaon Dabhade) या उपक्रमांतर्गत तळेगाव तलावात स्थानिक प्रजातींचे (रोहू, कटला, मृगाल) 5000 हून अधिक मत्स्य बीज सोडण्यात आले.

डॉ. सलीम अली हे याच तळ्यावर पक्षी निरीक्षणासाठी यायचे. येथे युरोपवरून तलवार बदक (Pintailed Duck) मोठ्या संखेने हिवाळ्यात स्थलांतर करून येत असत. तळेगावचे हे तळे 1983 पर्यंत स्थानिक व स्थलांतरीत विदेशी पक्षानी गजबजलेले असायचे. या नंतर हळू हळू हे तळे प्रदूषणाच्या विळख्यात अडकले.

तळेगाव तलावाला त्याचे नैसर्गिक गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्याच्या योजनेतील या उपक्रमाद्वारे प्रथम चरण पार पडले. यानंतर ही आणखी मत्स्य बीज वेळोवेळी सोडण्यात येईल. येथील जैविक साखळी परिपूर्ण व स्वयंभू होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न रोटरी क्लब व मनपा मार्फत केले जाणार आहे.

Dighi News : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

याप्रसंगी तळेगाव नगर परिषदेचे सीओ विजय सरनाईक आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे कडून अध्यक्ष अनिश होले, प्रकल्प प्रमुख महेश महाजन, मत्स्यतज्ञ रो. शशांक ओगले, क्लब पर्यावरण डायरेक्टर डॉक्टर ज्योती मुंदर्गी, आणि ज्येष्ठ रोटेरियन यादव शेठ खळदे यांच्यासह 35 हून अधिक रोटेरियन सहभागी होते.

मुख्याधिकारी श्री सरनाईक यानी तदानपा कडून यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील याची ग्वाही दिली व प्रकल्पाचे कौतुक केले. (Talegaon Dabhade) याप्रसंगी सचिव कमलेश कारले यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तर रोटरी क्लब उपाध्यक्ष उद्धव चितळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.