Dighi News : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – सासरी नांदत असलेल्या विवाहितेने (Dighi News) सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 31 डिसेंबर 2022 रोजी दुपारी दत्तनगर दिघी येथे घडली.

याप्रकरणी मयत विवाहितेच्या आईने (वय 50) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप जगन्नाथ जाधव (वय 42), दोन महिला (सर्व रा. दत्तनगर, दिघी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News : गाडीची तोडफोड करत सोनसाखळी व मोबाईल हिसकावला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी तिच्या सासरी नांदत असताना तिच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ केला. त्या छळाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने (Dighi News) 31 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.