Pimpri News : गाडीची तोडफोड करत सोनसाखळी व मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – गाडी अडवून सोनसाखळी तसेच मोबाईल हिसकावून घेत गाडीची ही तोडफोड करण्यात आली आहे. हा प्रकार रविवारी (दि.1) पिंपरीतील महेशनगर (Pimpri News) येथे घडला आहे.

याप्रकरणी मायकल डॉमनिक फर्नाडीस (वय 31 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गणेश विश्वकर्मा (वय 27),शुभम जाधव (वय 28) निलेश पाटोळे (वय 27) सर्व राहणार पिंपरी (Pimpri News) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

Pimpri Crime : पार्किंग व्यावसायिकाकडे खंडणी मागत दिली जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कारसमोर टूव्हीलर आणत रस्ता आडवून फिर्यादीला मारहाण केली, तसेच त्यांच्या गळ्यातील 11 ग्रॅम वजनाची 55 हजार रुपयांची सोन्याची साखळी, 30 हजार रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण 85 हजार रुपायांचा ऐवज चोरून फिर्यादीच्या कारच्या मागील व पुढील काचा दगडाने फोडून नुकसान केले.यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस (Pimpri News) पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.