दापोडी येथून अजित पवारांच्या रॅलीला सुरुवात

निगडी येथे होणार जाहीर सभा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक दोन दिवसावर आली असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) अजित पवार समारोपाचा प्रचार पिंपरी-चिंचवड परिसरात करणार असून दोपाडी येथून प्रचार रॅलीला सुरुवात झाली.

ही रॅली  दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, रहाटणी, लिंकरोड, चापेकरचौक, बिजलीनगर, प्रमलोकपार्क, खंडोबामाळ, मोरवाडी, नेहरुनगर, आचर्य अत्रे, लांडेवाडी, दिघी रोड, डॉ. आंबेडकर मैदानावर कोपरा सभा असेल.

त्यानंतर आळंदी रोड, नाशिक हायवे, धावडे वस्ती, इंद्रायणी नगर, स्पाईनरोड, साईनाथनगर, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, आकुर्डी गावठाण, म्हाळसाकांत चौक, प्राधिकरण, भेळ चौक यानंतर निगडीतील महापौर भवनच्या नियोजीत जागी दुपारी साडे तीन वाजता जाहीर सभा होणार आहे.

{fcomment}

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.