पुण्याचा पारा 33 अंशावर ; प्रचारकांनाही चटके

एमपीसी न्यूज – पुण्याचा पारा कमाल तापमान 33 अंशांवर पोहचला आहे. तर दुसरीकडे प्रचारासाठीही अवघे काही तास राहिल्यामुळे हवामान व राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. त्यामुळे आज नेत्यांपासून कार्यकर्त्यापर्यंत सर्वांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.  

आज रॅली, सभा, पदयात्रा  यांची पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात रेलचेल आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र सुर्य मध्यावर येईपर्यंत तापमान 33 अंशाच्या वर पोहचले आहे. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही  चांगलीच दमछाक होत आहे. उन्हाचे चटके सहन करतच त्यांना मतदानाचे दान मगावे लागत आहे. त्यात रविवार व शेवटचा प्रचाराचा दिवस असल्याने भर उन्हातही रॅली काढल्या जात आहे.

हा प्रचार संध्याकाळी पाचनंतर थंडावणार असल्यामुळे उन्हे कलल्यानंतरच  प्रचार सुद्धा थांबणार आहे. शनिवारीही मुख्यमंत्रंयांची सभा  कार्यकर्त्यांना भर उन्हातच बसून ऐकावी लागली. हा पारा  पुढील काही दिवस 32 ते 35 अंशावर  राहणार आहे. त्यामुळे मतदारांनाही उन्हाचा सामना करावा लागणार आहे.

{fcomment}

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.