जिओ धारकांना वार्षिक 99 रुपये भरून दरमहा 303 रुपयांत अनलिमिटेड इंटरनेट

31 मार्चनंतर विनामूल्य सेवा होणार बंद; नवीन ऑफर एक वर्षासाठी

एमपीसी न्यूज – रिलायन्सने नुकतीच जिओ 4 जी च्या ग्राहकांसाठी प्राईम ऑफर लाँच केली आहे. यामध्ये वार्षिक 99 रुपये भरून दरमहा 303 रुपयांत अमर्याद इंटरनेटची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले. सध्या रिलायन्स जिओची सेवा 31 मार्चपर्यंत विनामुल्य आहे. 1 एप्रिलपासून रिलायन्स जिओसाठी दर आकारण्यात येणार होता.

रिलायन्स जिओ 4 जी च्या विनामूल्य सेवेची मुदत 31 मार्चपर्यंत होती. त्यानंतर रिलायन्सतर्फे दर आकारणी केली जाणार होती. त्यामुळे रिलायन्स जिओचे दर काय असतील याकडे सर्वच ग्राहकांचे लक्ष लागून होते. या ग्राहकांसाठी तसेच ज्यांनी 31 मार्चपर्यंत जिओची सेवा घेतली आहे. त्यांच्यासाठी रिलायन्सने धमाकेदार ऑफर लाँच केली आहे. त्याअंतर्गत जे रिलायन्स जिओचे विद्यमान ग्राहक आहेत त्यांना रिलायन्सच्या या ऑफरचा लाभ घेता येईल. रिलायन्सतर्फे वार्षिक रुपये 99 भरून दरमहा 303 रुपये या दरात अमर्याद इंटरनेट सेवा उपभोगता येणार आहे. दररोज जवळपास केवळ 10 रुपयात तुम्हाला अमर्याद इंटरनेट वापरता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.