…आणि रंगली पिंपरी रेल्वेस्थानकाची भिंत

कलेचा असाही उपयोग

एमपीसी  न्यूज – पिंपरीतील रेल्वे स्थानक येथील भिंतीवर विविध क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येऊन आपली कला या  कार्टुन्स, संदेश माध्यमांतून रंगवून कला जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
 

निमित्त आहे कलेतून स्वच्छतेसाठी लोकांना झुकवण्याचे. थिसेनक्रुप व वानरसेना ग्रुप (एनजीओ) यांच्या वतीने ही कला सादर करण्यात येत आहे. यामध्ये पिंपरी रेल्वेस्थानकातील असणारी अस्वच्छता, टॉयलेट्स हे स्वच्छ करण्याचे काम यांनी केले आहे. 25 व 26 या दोन दिवसीय कालावधीत हा इव्हेंट घेण्यात आला. थिसेनक्रुपचे 500 व वानरसेनेचे 500 असे मिळून हजार नागरिकांच्या सहाय्याने पिंपरी रेल्वे स्थानक मॉडेल स्थानक होत आहे.

या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना स्वप्नील कुमावत व अनिल गोडसे म्हणाले की, सामाजिक कार्य करत असताना आपण कोठेही मागे पडू नये, पिंपरी रेल्वे स्थानकालगतच थिसेनक्रुप कंपनी आहे. या कंपनीच्या सीएसआरच्या माध्यमांतून 2 करोड खर्च रिव्हॉल्युशनसाठी आहे. तो आम्ही या उपक्रमासाठी वापरण्याचा प्रयत्न करणार आहोत. यात टॉयलेट्स बदलण्यात येत असून त्याच्या भिंती ही रंगविण्यात आल्या आहेत. कलेच्या माध्यमांतून लोकांना एकत्र जोडणे हा मूळ उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.



या कलेच्या माध्यमांतून भिंतींवर लहान मुलांनी कार्टुन्सच्या माध्यमांतून संदेश दिले आहे. स्वच्छ भारत अभियान, आमचे गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू… आणि आमच्या घरी, शेजारीपाजारी स्वच्छतेचा संदेश पोहोचवू, आम्ही स्वच्छता ठेवू असे संदेश भिंतीवर लिहिण्यात आले आहेत. वानरसेना ग्रुपमध्ये स्वप्नील कुमावत, अमृता जांबखेडकर, मिनल जांबखेडकर, स्वाती गावडे, सोमेन दास, प्रसाद भारद्वाज, सत्वशील जगताप यांचा या वानरसेनेमध्ये समावेश आहे.

 

"Pimpri

 

"Pimpri

 

"Pimpri

 

"Pimpri

 

"Pimpri

 

"Pimpri

 

"Pimpri

 

"Pimpri

 

"Pimpri

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.