मसाप गप्पा कार्यक्रमात येत्या सोमवारी डॉ. अरुणा ढेरे यांच्याशी संवाद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात येत्या सोमवारी (दि.06) सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री डॉ. अरुणा ढेरे सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी सव्वासहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे यांचा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमात त्यांच्याशी लेखिका नीलिमा बोरवणकर संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.