निवडणुकीतील गैर व्यवहाराविरुद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन करणार आंदोलन

एमपीसी न्यूज –  पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या. मात्र, यामध्ये निवडणुकीतील गैर व्यवहार, इव्हीएम मशिनमधील गोंधळ, असे अनेक आरोप करण्यात आले. या गैरप्रकाराविरुद्ध पुणे विधान भवनाबाहेर 4 मार्च रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते  श्रीजीत रमेशन करणार आहेत.

महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेतील त्रुटी, गैरप्रकार, उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते निकाल लागेपर्यंत झालेले राजकीय गोंधळ, मतदान करताना ईव्हीएम मशीनमध्ये झालेले गोंधळ आदी गोष्टींच्या विरोधात रमेशन आंदोलन करणार आहेत.

यावेळी त्यांनी संबंधित दोषी अधिका-यांची चोकशी करण्यात यावी. बॅलेट पेपरचा वापर करून पुन्हा निवडणुका व्हाव्यात, जेथे राजकीय वाद गैरव्यवहार यांची दखल घेण्यात यावी. या निवडणुकीत इव्हीएम मशिनचा वापरा केला जाऊ नये, अशी मागणी श्रीजीत रमेशन यांनी पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.