चिंचवडच्या बिग बाजारमधील गीतेतील श्लोक लिहलेल्या कपड्यांच्या विक्रीवर महानुभव परिषदेचा आक्षेप

तक्रारीनंतर बिग बाजारची संबंधित कंपड्यांच्या विक्रीवर बंदी

एमपीसी न्यूज – चिंचवडमधील बिग बाजार मॉलमध्ये श्रीमद् भगव्दगीतेतील श्लोक प्रिंट केलेले कपड्यांची विक्री केली जात होती. मात्र, हा गीतेचा अपमान आहे, असे म्हणत अखिल भारतीय महानुभव परिषदेतर्फे या कंपड्यांच्या विक्रीवर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर बिग बाजारने तातडीने या कपड्यांची विक्री थांबवली आहे.

याविषयी अखिल भारतीय महानुभव परिषद आणि नागरिकांनी चिंचवड पोलिसांकडे कायदेशीर निवेदनही दिले. तसेच बिग बाजार प्रशासनालाही अशा कपड्यांची विक्री थांबवावी, असे निवेदन देण्यात आले. त्याप्रमाणे बिग बाजार व्यवस्थापनाकडून  कपड्यांची विक्री थांबविण्यात आली आहे. दरम्यान, उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. त्यानुसार पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेत संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

याआधीही नागपूरमध्ये बिग बाजार मॉलमध्ये मराठीतील आद्य ग्रन्थ लीळा चरित्राचे श्लोक विक्री केल्याचे प्रकारही समोर आले होते. त्यामुळे कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत. यासाठी बिग बाजार प्रशासनानेही संबंधित पोशाख   मॉलमधून काढून टाकले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.