घराची सातबा-यावर नोंद करण्यासाठी लाच घेताना तलाठी महिलेला रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – नवीन घराची नोंद साताबारा उता-यावर घेऊन उतारा देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेताना तलाठी महिलेला आणि तिच्या हस्तकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसबीने) रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवारी) पिंपरीगावातील तलाठी कार्यालयात करण्यात आली.



तलाठी वैशाली नामदेव मोरे (वय 36, रा. पिंपरीगाव) आणि परमेश्वर सिदराम बनसोडे अशी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पिंपरीगावातील तलाठी कार्यालयात वैशाली मोरे तलाठी आहेत. तक्रारदाराने नवीन घर बांधले आहे. घराची सातबारा  उता-यावर नोंद होण्यासाठी आणि नोंद केलेला उतारा मिळण्यासाठी तक्रारदाराने तलाठी कार्यालयाकडे अर्ज केला होता.

घराची नोंद साताबारा उता-यावर घेऊन उतारा देण्यासाठी तलाठी वैशाली मोरे यांनी तक्रारदाराकाडे सात हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच त्यांचा हस्तक बनसोडे याच्याकडे देण्याचे सांगितले होते. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधत विभागाकाडे तक्रार दिली होती.

लाच देण्याचे गुरुवारी ठरली होते. त्यानुसार एसीबीच्या पथकाने पिंपरीगावातील तलाठी कार्यालयात सापळा रचून तलाठी मोरे यांचा हस्तक बनसोडे याला तक्रारदाराकडून सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता बनसोडे याने तलाठी मोरे यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.