सॉलिटेअरची स्ट्रायकर्सवर मात धीरजचे अर्धशतक, पीसीएमए युनायटेडचा विजय

फेडरेशन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा 2017

एमपीसी न्यूज – धीरज गुंदेशाच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर सॉलिटेअर इलेव्हन संघाने फेडरेशन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत ओएनवायक्स स्ट्रायकर्स संघावर 41 धावांनी मात केली. पीसीएमए युनायटेड, पीटीएसडीए रॉयल्स संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

पुणे व्यापारी महासंघातर्फे आयोजित ही स्पर्धा मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर सुरू आहे. सॉलिटेअर इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 10 षटकांत 2 बाद 113 धावांपर्यंत मजल मारली. यात धीरज आणि धीरेश सोलंकी जोडीने 83 धावांची सलामी दिली. धीरेशने 20 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 38 धावा केल्या. यानंतर धीरजने सॉलिटेअर संघाला 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला. धीरजने 28 चेंडूंत 7 चौकारांसह नाबाद 52 धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना स्ट्रायकर्स संघाला 9 बाद 72 धावाच करता आल्या.


दुस-या लढतीत पीसीएमए युनायटेड संघाने पीसीपीडीए इलेव्हन संघावर 8 गडी राखून मात केली. भूषण वसूलकरच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर युनायटेड संघाने पीसीपीडीए इलेव्हन संघाला 9 बाद 60 धावांत रोखले. भूषणने तीन फलंदाजांना बाद केले. यानंतर पीसीएमए युनायटेड संघाने विजयी लक्ष्य 7.3 षटकांत 2 गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.

यानंतर झालेल्या लढतीत पीटीएसडीए रॉयल्स संघाने स्टोन स्ट्रायकर्स संघावर 7 गडी राखून सहज मात केली. स्ट्रायकर्सने दिलेले 92 धावांचे लक्ष्य रॉयल्स संघाने 3 गडी गमावून 8.1 षटकांतच पूर्ण केले. यात मिथून किराडने 19 चेंडूंत 6 षटकार व 2 चौकारांसह नाबाद 53 धावा केल्या. रॉयल्स संघाचा हा अ गटातील सलग चौथा विजय ठरला. गौरव शाहच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मशिनरी मास्टर्स संघाने पाडा वॉरियर्स संघावर 6 गडी राखून मात केली. गौरव शाहने दोन गडी बाद केले. त्यानंतर त्याने 27 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 61 धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक – 1) सॉलिटेअर इलेव्हन – 10 षटकांत 2 बाद 113 (धीरज गुंदेशा नाबाद 52, धीरेश सोलंकी 38, विनोद बाफना 2-22) वि. वि. ओएनवायएक्स स्ट्रायकर्स – 10 षटकांत 9 बाद 72 (विनोद बाफना 19, अमित ओसवाल 17, अभय जैन 3-11, सुदर्शन कवेडिया 1-12, अंकित सोनीग्रा 1-9). सामनावीर – धीरज गुंदेशा.

3) स्टोन स्ट्रायकर्स – 10 षटकांत 7 बाद 91 (देनिश पटेल 22, निखिल बोहरा 14, अमित सोनिग्रा 2-16, कुणाल जैन 1-18) पराभूत वि. पीटीएसडीए रॉयल्स – 8.1 षटकांत 3 बाद 95 (मिथुन किराड नाबाद 53, निनाद शाह 14, रिषभ चोप्रा 1-12). सामनावीर – मिथून किराड.

4) पाडा वॉरियर्स – 10 षटकांत 5 बाद 86 (चरणजित कार्ला 16, अनूप पट्टानी 15, सचिन शाह नाबाद 14, गौरव शाह 2-12, चंद्रेश राठोड 1-9) पराभूत वि. मशिनरी मास्टर्स – 9.5 षटकांत 4 बाद 92 (गौरव शहा नाबाद 61, सौरभ काकडे नाबाद 12, मंदार मणियार 2-3). सामनावीर – गौरव शाह.

5) सीएमडीए आयटी रॉयल्स – 10 षटकांत बिनबाद 105 (संजय देसाई नाबाद 73, रिषी चेनानी 23) पराभूत वि. पुष्पक इन्फ्राकॉन इलेव्हन – 10 षटकांत 7 बाद 66 (प्रतीक दोशी 21, योगेश शाह नाबाद 12 मुन्नवार इनामदार 3-17). सामनावीर – संजय देसाई.

6) पीसीपीडीए इलेव्हन – 10 षटकांत 9 बाद 60 (संजय सेठी 16, अनिरुद्ध भोळे 15, भूषण वसूलकर 3-8, धवल मेहता 2-12, सचिन बोत्रे 2-12) पराभूत वि. पीसीएमए युनायटेड – 7.3 षटकांत 2 बाद 63 (निखिल ओसवाल 23, आदिश शाह 18, हितेश शाह 1-15, योमेश शाह 1-7).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.