आमच्यात दुरावा नाही – राजू शेट्टी

एमपीसी न्यूज – राज्याचे पणन मंत्री सदाभाऊ खोत आज पुण्यात विश्रामगृहात राजू शेट्टीही येणार असल्याचे समजताच त्यांनी त्यांचा मुक्काम पाणी पुरवठा विभागाच्या विश्रामगृहात हलवला. तसेच त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शुक्रवारी पुण्यात झालेल्या चिंतन बैठकीला देखील सदाभाऊ खोत यांनी दांडी मारली. यामुळे या दोघांमधील संबंध आणखी ताणले गेल्याच्या चर्चा राज्यामध्ये सुरु झाल्या. यावर खासदार राजू शेट्टी म्हणाले की, सदाभाऊ खोत यांनी मला टाळलेले नाही. संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक असल्यामुळे त्यांना जागेची कमतरता होऊ नये यासाठी त्यांनी खोली सोडली आहे. ते मंत्री असल्यामुळे त्यांच्या शहरात अनेक बैठका  होत्या. आमचीही कार्यकर्त्यांची बैठक होती. त्यामुळे भेट होऊ शकली नसून आमच्या दोघामंध्ये कोणत्याही प्रकारचा दुरावा नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मागील काही दिवसापासून सदाभाऊ आणि राजू शेट्टी यांच्यातील अबोला हा राज्यातील शेतक-यांमध्ये चर्चेचा विषय ठरला असून त्याचा फटका यापुढील कालावधीत शेतकरी संघटेनेला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. आता त्यात आज प्रकारामुळे आणखी भर पडल्याचे समोर आले आहे. राजू शेट्टी आणि सदाभाऊ हे दोन्ही नेत्यांच्या आज अनेक बैठका आयोजित करण्यात आल्या आहे. तसेच राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक नेते देखील पुण्यात आले आहे. या दोन्ही नेत्यांच्या आजच्या अशा प्रकारामुळे मंत्र्यामध्ये चर्चेचा विषय ठरला.

याविषयी  खासदार राजू शेट्टी म्हणाले की, सदाभाऊ हे मंत्री आहेत ते त्यांची जबाबदारी पार पाडित आहेत. तर मी संघटनेतील कार्यकर्त्यांना उर्जा देण्याचे काम करीत आहे. पक्ष प्रमुख म्हणून मी माझी जबाबदारी पार  पाडतोय. निवडणुकीच्या निकालानंतर सदाभाऊ देशाबाहेर गेले होते. त्यामुळे त्यांची आणि माझी भेट होऊ शकली नाही. मात्र, लवकरच दोघांची भेट होईल, असे सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याच्या प्रयत्न त्यांनी केला.

राज्याचे पणन मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, आम्ही दोघे ही राहण्यास जवळच आहोत. मात्र, दोघांमध्ये किती किलोमीटरचे अंतर पडले आहे,  हे अजून मोजले नाही. आमच्या आज दोघांच्याही बैठका होत्या. मात्र, शासकीय कामामध्ये मी व्यस्त आहे. त्यातून निवांत झाल्यानंतर मी त्यांची भेट घेईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.