सेंट्रल रेल्वे (पुणे विभाग) संघाला विजेतेपद !


सहावी हुसेन अखिल भारतीय हॉकी स्पर्धा!

एमपीसी न्यूज – कै. हुसेन नाबी शेख हॉकी अँड स्पोर्टस् फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सहाव्या कै. हुसेन अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत सेंट्रल रेल्वे(पुणे विभाग) संघाने बॉम्बे इंजीनिअरींग ग्रुप, खडकी संघाचा 2-1 असा सनसनाटी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे झालेल्या स्पर्धेत सेंट्रल रेल्वे(पुणे विभाग) संघाने 0-1 अशा पिछाडीवरून जिगरबाज खेळी करत विजयश्री खेचून आणली. युवराज वाल्मिकी व विशाल पिल्लेयांनी विश्रांतीनंतर केलेल्या दोन गोलांच्या जोरावर सेंट्रल रेल्वेसंघाने विजेतेपदाला गवसणी घातली. बॉम्बे इंजीनिअरींग ग्रुप खडकी संघाकडून अजित शिंदे याने गोल केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण ऑलंपिक हॉकीपटू धनराज पिल्ले आणि सुरय्या हुसेन शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एनसीबी युवा विभागाचे प्रमुख विशाल वाकडकर, अमित देवकर, ऑलंपियन अजित कार्ला, फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विभाकर तेलोरे, फाऊंडेशनचे सचिव सादीक शेख, अमित खराडे, रोहन जवळे आणि नितीन शहा आदि मान्यवर उपस्थित होते. विजेत्या सेंट्रल रेल्वे संघाला 21 हजार रूपये तर, उपविजेत्या बीईजी संघाला 11 हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. 

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान युवराज वाल्मिकी सेंट्रल रेल्वे), सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा मान अवधूत सोलणकर (सेंट्रल रेल्वे), सर्वोत्कृष्ट रक्षक कांचन राजबीर (बीईजी), सर्वोत्कृष्ट हाफ राहूल शिंदे (क्रिडा प्रबोधिनी), सर्वोत्कृष्ट फॉवर्डसंजय टोप्पो (बीईजी), सर्वोत्कृष्ट संघ (प्रॉमिसींग टिम) स्पोर्टस् अ‍ॅथॉरीटी ऑफ गुजरात अशी पारितोषिकेही देण्यात आली. यासह किरण खैराळे आणि सिकंदर जाफर यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आला. 

स्पर्धेचा निकाल 

अंतिम फेरीः सेंट्रल रेल्वे(पुणे विभाग- 2 (युवराज वाल्मिकी 41 मि., विशाल पिल्ले 65 मि.) वि.वि. बॉम्बे इंजीनिअरींग ग्रुप खडकीः 1 (अजित शिंदे31 मि.); हाफ टाईमः 0-1;

तिसर्‍या स्थानासाठीः क्रिडा प्रबोधिनीः 11 (हरीश शिंदगी 5, 70 मि., सुनिल राठोड 9 मि., अजिंक्य जाधव 17, 38, 68, 70 मि., राजेस मुजावर 24 मि., वैंकटेश केंचे 27 मि., अनिकेत गौरव 51, 52 मि.) वि.वि. पीसीएमसीः 2 (आनंद गायकवाड 47 मि., अंकुश कांबळे 66 मि.); हाफ टाईमः 4-0;

हुसेन फाऊंडेशन तर्फे अखिल भारतीय महिला हॉकी स्पर्धेचे 2018 मध्ये आयोजन

स्व.हुसेन नाबी शेख हॉकी आणि स्पोर्टस् फाऊंडेशन तर्फे महिलांसाठीच्या अखिल भारतीय स्पर्धेचे 2018 मध्ये आयोजन करण्याची घोषणा आज करण्यात आली.

फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विभाकर तेलोरे यांनी आज ही घोषणा केली. गेली अनेक वर्ष आम्ही पुरूष गटाची स्पर्धा आयोजित करत होतो. पण महिला विभागाची स्वतंत्र स्पर्धा आम्ही आयोजित करणार आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.