आयकर व अबकारी कर संघ, पीसीएमसी इलेव्हन, प्रियदशर्नी स्पोर्टस् सेंटर संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !

पिंपरीतील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेला शानदार सुरुवात

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिका आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेत आयकर व अबकारी कर (सेंट्रल एक्साईझ) संघ, पीसीएमसी इलेव्हन व प्रियदशर्नी स्पोर्टस् सेंटर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला.

पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आजपासून सुरू झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तुशा दौंडकर, स्पर्धेचे संयोजन सचिव वसंत मोरे, हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा सुरेखा पाटील, मानद सचिव मनोज भोर यांच्या उपस्थितीत झाले.

आयकर व सेंट्रल एक्साईज संघाने किडस् इलेव्हन संघाचा 9-0, असा सहज पराभव केला. पीसीएमसी इलेव्हन संघाने फ्रेन्डस् युनियन संघाचा 4-1 असा पराभव करून विजयी सलामी दिली. प्रियदशर्नी स्पोर्टस् सेंटर संघाने चिखलवाडी यंग बॉईजचा 3-1 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

स्पर्धेचा निकालः आयकर व सेंट्रल एक्साईजः 9 (आशितोष लिंगेश 3, 42 मि., नितीन कुमार 6 मि., अजितेश रॉय 12, 28 मि., संतोष कस्तुरे 26 मि., विनोद पिल्लई 40 मि., सीएफ राजरत्नम 44 मि., विक्रम सिंग 48 मि.) वि.वि. किडस् इलेव्हनः 0; पूर्वार्ध5-0;

2) पीसीएमसी इलेव्हनः 4 (नरेश चाटोळे 5, 8 मिण, नासिर पठाण 49 मि., हर्ष परमार 50 मि.) वि.वि. फ्रेन्डस् युनियनः 1 (अलिम शेख 45 मि.); पूर्वार्ध 2-0;

3) प्रियदशर्नी स्पोर्टस् सेंटरः 3 (अब्दुल सलमानी 4 मि., अजिंक्य काळभोर 24, 30 मि.) वि.वि. चिखलवाडी यंग बॉईजः 1 (नागेश दुर्गा 32 मि.).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.