शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

प्रियदशर्नी संघाचा सनसनाटी विजय; इनकम टॅक्स अॅण्ड सेंट्रल एक्साईज संघाची आगेकूच

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धा

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिका आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेत पुणे प्रियदशर्नी स्पोर्टस् सेंटर संघाने प्रभाकर अस्पत अ‍ॅकॅडमीचा 3-2 असा निसटता पराभव केला. आयकर आणि अबकारी कर (इनकम टॅक्स अॅण्ड सेंट्रल एक्साईज) संघाने पीसीएमसी संघाचा सहज पराभव करून आगेकूच केली.

पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सुरू असलेल्या स्पर्धेत आज झालेल्या सामन्यामध्ये इनकम टॅक्स अॅण्ड सेंट्रल एक्साईज संघाने विश्रांतीनंतर दणदणीत खेळ करताना सलग चार गोल नोंदवून सामन्यात विजय मिळवला. हाफ टाईमपर्यंत 2-1 अशी आघाडी प्रियदशर्नी संघाकडे होती. संघाकडून सीएफ राजरत्नम याने तीन गोल केले. आशिष चेट्टी, आशुतोष लिनेश व सुधीर दीक्षित यांनी प्रत्येकी एक गोल केले.

चुरशीने लढल्या गेलेल्या सामन्यात अब्दुल सलमानी याने केलेल्या निर्णायक गोलाच्या जोरावर प्रियदशर्नी स्पोर्टसेंटर सामन्यात विजय मिळवला. सामन्यामध्ये अब्दुल सलमानी याने दोन तर, अर्थव कांबळे याने एक गोल केला. प्रभाकर अस्पत अ‍ॅकॅडमीकडून संजय पोल्लाया व शुभम ठाकूर यांनी गोल केले.

स्पर्धेचा निकालः 1) इनकम टॅक्स अॅण्ड सेंट्रल एक्साईजः 6 (आशिष चेट्टी 3 मि., सीएफ राजरत्नम 13, 39, 43 मि., आशुतोष लिनेश 32 मि., सुधीर दीक्षित 45 मि.) वि.वि. पीसीएमसी इलेव्हनः 1 (सौरभ पाटील 21 मि.); हाफ टाईमः 2-1;

2) प्रियदशर्नी स्पोर्टसेंटरः 3 (अब्दुल सलमानी 28, 43 मि., अर्थव कांबळे 42 मि.) वि.वि. प्रभाकर अस्पत अ‍ॅकॅडमीः 2 (संजय पोल्लाया 8 मि., शुभम ठाकूर 39 मि.); हाफ टाईमः 1-1;

spot_img
Latest news
Related news