महिला सुरक्षित असतील तरच समाजाची प्रगती – गणेश शिंदे

एमपीसी न्यूज – भारतीय महिलांना आजही दुय्यम वागणूक मिळते. उक्ती आणि कृतीत फरक असल्यामुळे महिलांना कमी लेखले जाते. विचारातील आधुनिकता प्रत्यक्षात जेव्हा उतरेल तेव्हाच महिला दिनाचे साजरीकरण मोठ्या रितीने होईल. महिला सुरक्षित असतील तरच समाजाची प्रगती होऊ शकते, असे मत परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी आज (बुधवारी) चिंचवड येथे व्यक्त केले.

जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवड येथील अॅटो क्लस्टर सभागृहात पोलिसांच्या वतीने महिला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रतिभा महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वनिता कु-हाडे, प्रा. रुपा शहा, पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, मसाजी काळे, पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी प्रतिभा महाविद्यालयाच्या प्रा. रुपा शहा यांचे ‘महिला सबलीकरण’ या विषयावर व्याख्यान झाले. विभक्त होणार असलेल्या एका जोडप्यांचे समुपदेशन करून संसाराला लावले. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

‘एमपीसी न्यूज’च्या ज्येष्ठ पत्रकार स्मिता जोशी, प्रभातच्या निशा पिसे, पुढारीच्या पुनम पाटील, श्वेता घुमसे, मनिषा पिसाळ, यांच्या उपायुक्त गणेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.