रविवार, फेब्रुवारी 5, 2023

दागिने पॉलिशच्या बहाण्याने सोन्याच्या बांगड्या लांबविल्या

एमपीसी न्यूज – दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोघांनी हातचलाखीने 75 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. ही घटना गुरुवारी (दि.9) दुपारी सव्वादोनच्या सुमारास कासारवाडी येथे घडली.

याप्रकरणी कोयल कटारीया (वय 27, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयल कटारीया गुरुवारी एकट्याच घरी होत्या. दुपारी दोघे जण त्यांच्या घरी आले. भामट्यांनी दागिने पॉलिश करून देतो, असे कटारीया यांना सांगितले. त्यांच्याकडून सोन्याच्या बांगड्या पॉलिश करण्यासाठी घेतल्या. हातचलाखी करून 75 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. भोसरी ठाण्याच्या फौजदार एन. ए. डावरे तपास करत आहेत.

Latest news
Related news