शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

एकविरा विद्यालयाने पटकावली डायरेक्ट युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप

एमपीसी न्यूज – कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने सिंहगड हायस्कूल कुसगाव येथे आयोजित केलेल्या डायरेक्ट युथ पार्लमेंट चॅम्पियनशीप या वक्तृत्व स्पर्धेत कार्ला गावातील एकविरा विद्यालयाने चॅम्पियनशीप मिळवली.

स्पर्धेचे उद्घाटन लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंहगडचे कॅम्पस डायरेक्टर एम.एस.गायकवाड, प्राचार्य रोखले, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विशाल विकारी, देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक बापू पाटील, शहाजी लाखे, विजय कचरे, प्रा. पवार आदी उपस्थित होते.

चॅम्पियनशीप वक्तृत्व स्पर्धेत एकविरा विद्यालय कार्ला (प्रथम), वामनराव हैबतराव देशमुख विद्यालय देवघर (द्वितीय), शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय मळवली (तृतीय) यांनी क्रमांक मिळविला. तर वैयक्तिक स्पर्धेत एकविरा विद्यालयाची गोपीनाथ देवकर, सिद्धार्थ कांबळे व धनश्री अय्यर यांनी अनुक्रमे नववी, आठवी व सातवीच्या गटात प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक देशमुख विद्यालयाची वैष्णवी खंडू शेलार हिने मिळविला. सर्व विजयी व सहाभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली तर शाळांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

spot_img
Latest news
Related news