लोणावळा शहरात युवासेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – शिवसेनेशी संलग्न असलेल्या युवासेना या संघटनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन गोल्ड व्हॅली तुंगार्ली येथे तानाजी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे मावळ तालुकाध्यक्ष अनिकेत घुले यांच्या हस्ते या नवीन शाखेच्या नामफलकाला नारळ वाढवून करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख जयवंत दळवी, माजी सरपंच संजय भोईर, श्रीकांत कंधारे, युवासेनेचे लोणावळा शहर पदाधिकारी तानाजी सूर्यवंशी, ओमकार फाटक, शाम सुतार आदी उपस्थित होते. युवासेनेच्या माध्यमातून युवकांना समाजकार्य करण्याची संधी मिळाली आहे. तिचे सोनं करा, असे यावेळी अनिकेत घुले यांनी सांगितले.
शाखेची कार्यकारिणी संतोष गायकवाड (अध्यक्ष), स्वप्नील ढाकोळ व बसूराज पाटोळे (उपाध्यक्ष), अनुप शिंदे (शाखाप्रमुख), आकाश गायकवाड व सोनु लष्करे (उप शाखाप्रमुख) असणार आहेत.