काळेपडळ येथे पॅकेजींग कंपनीतील पुठ्ठ्यांना आग

एमपीसी न्यूज – हडपसर येथील काळेपडळ परिसरातील पुठ्‌याच्या श्री पॅकेजींग कंपनीत आज दुपारच्या सुमारास आग लागली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळविले.


हडपसर येथील काळेपडळ परिसरातील इंडस्ट्री परिसरात हि कंपनी होती. आज गुरुवार असल्याने कंपनीला सुट्टी होती. या कंपनिजवळच येथील कामगारांची घरे आहेत. आज दुपारच्या सुमारास कंपनीमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच कामगारांनी याची माहिती अग्निशामक दलाल दिली.

अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले.

अग्निशामक दलाच्या चार ते पाच पथकांनी मिळून या आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत किती नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

"fiar
"fiar

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.