पिंपरी पेंढार येथील स्पर्धेत आय एस सी मालेगाव संघ प्रथम

एमपीसी न्यूज – एस एम चैतन्य स्पोर्ट्स असोसिएशन पिंपरी पेंढार व राफिकभाई काझी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी पेंढार येथे राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत  प्रथम क्रमांक आय एस सी मालेगाव, द्वितीय क्रमांक संजय भोसले प्रतिष्ठान माळशिरस आणि तृतीय क्रमांक नवजीवन स्पोर्ट्स मालेगाव संघाने पटकावला.
या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असणाऱ्या संघानी सहभाग घेतला .स्पर्धेचे उद्घाटन राफिकभाई काझी व शशिकांत सोनवणे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अमित बेनके, रतन चव्हाण, राघव पोटे, नवनाथ नवले, बाळासाहेब सावंत, जयसिंग पोटे, किरण कुटे आदी उपस्थित होते. स्पर्धेमधील विजयी संघांना आमदार शरद सोनवणे, सत्यशील शेरकर,  रामदास वेठेकर  यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले .याप्रसंगी रोहित खर्गे, गणेश जाधव, रोहिदास वेठेकर, पत्रकार किरण वाजगे, विमलेश गांधी, किरण कुटे उपस्थित होते.


स्पर्धेत चतुर्थ क्रमांक अजमल स्पोर्ट्स मालेगाव, पाचवा क्रमांक इस्तीयाक मालेगाव, सहावा क्रमांक एम आझाद जामनेर, सातवा क्रमांक सांगली शहर आणि आठवा क्रमांक भारती विद्यापीठ संघाने पटकावला.


या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणा-यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. यामध्ये उत्कृष्ट शूटर खुर्शीद अन्सारी, उत्कृष्ट स्कूपर वकार अन्सारी, उत्कृष्ट नेटमन ओंकार भरे यांना देण्यात आले. अंतिम सामना अतिशय चुरसीची झाला. त्यात जाहीर अन्सारी व वकार अन्सारी यांनी चौफेर फटकेबाजी करून चैतन्य चषक पटकावला. विरोधी संघाकडून राष्ट्रीय खेळाडू जयंत खंडागळे याने नेत्रदीपक खेळ केला पण त्याची लढत अपुरी ठरली व मालेगाव संघाने हि लढत 21-19 अशी जिंकली.


चैतन्य पुरस्कार 2017 श्री भालचंद्र सबाजी कुटे व भागजी बारकू तपासे यांना बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे व पुणे जिल्हा परिषदे चे गटनेते शरद लेंडे यांचे हस्ते यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. पंच म्हणून नंदकुमार भोइटे, जावेद मनोरे, क़े. डी. वाघमारे यांनी काम पाहिले. प्रस्ताविक रघुनाथ चव्हाण तर सूत्रसंचालन जनार्दन कुटे,  समालोचन अरविंद कुटे व सचिन वेठेकर, आभार विठ्ठल दुरगुडे यांनी मानले. गुणलेखक वसंत शेटे, संदीप देवगिरे, अविनाश जाधव, अमोल कुटे केले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केशव पठारे ,चेतन जाधव ,जावेद मोमीन ,सुधीर कुटे ,शंकर दुरगुडे ,राहुल दुरगुडे ,शिवम् कुटे,अजित वाकचौरे यांनी परिश्रम घेतले.                     

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.