देहूरोड ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अजित दळवी निलंबित

जमिनीचे प्रकरण भोवले?   

एमपीसी न्यूज – देहूरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित दळवी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी ही कारवाई केली आहे.

देहूरोड ठाण्याच्या हद्दीतील जमिनीच्या प्रकरणात दळवी यांनी मध्यस्ती केल्याने कारवाई केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याविरोधात नागरिकांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या, असे सूत्रांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी सुवेझ हक यांनी दळवी यांच्या निलंबनची ऑर्डर काढली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. आकाश शिंदे यांनी दळवी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.