लोणावळ्यात भर दिवसा दोन ठिकाणी घरफोड्या


एमपीसी न्यूज –  लोण‍वळ्यातील भ‍ांगरवाडी व गावठाण या ठिकाणी आज भर दुपारी दोन घरफोड्या झाल्या.

पहिली घरफोडी भांगरवाडी येथिल तालिम ओटासमोर पाठारे बिल्डिंगमध्ये आजिनाथ काटे (वय 28) याच्या घरात झाली. दरवाजाला कडी असल्याचा डाव साधत सुटाबुटातील तिन चोरट्यांनी घरात घुसून कपाटात एका डब्यात ठेवलेली एक तोळ्याची सोन्याची चैन, दोन अंगठ्या, दोन गळ्यातील पानं, एक नथ, लहान मुलांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा साधारण 75 हजारांचा मुद्देमाल पळविला.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडते ना घडते तोच गावठाण लोणावळा येथे अडीच वाजता ज्योती अशोक हारपुडे (वय 45) यांच्या घरात चोरट्यांनी हात मारत 21 हजारांची रोकड, कानातील व गळ्यातील चैन मिळून एक तोळा सोनं असा 51 हजारांचा मुद्देमाल पळविला. याठिकाणी देखिल तिन जण होते असे सांगण्यात आले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.